शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:19 IST

अनुभवी विरुद्ध नवखे, तर कुठे घराणेशाही विरुद्ध बदल अशी लढत 

सांगली : सांगली-मिरज–कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी तब्बल ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महापालिकेच्या २० प्रभागांपैकी तब्बल १५ प्रभागांमध्ये माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती, तसेच माजी आमदारांचे नातेवाईक यांच्यात थेट लढती होत असल्याने या प्रभागांमध्ये बिग फाईट पहायला मिळत आहे.महापालिकेची निवडणूक तिरंगी, चौरंगी होत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली आहे. निवडणुकीच्या मैदानात यंदा अपक्षासह राजकीय पक्षांचे ३८१ उमेदवार उतरले आहेत. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी पक्षांतर करीत इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. अनुभवी विरुद्ध नवखे, तर कुठे घराणेशाही विरुद्ध बदल अशी लढत पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळते की नव्या चेहऱ्यांना मतदार पसंती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच स्थानिक आघाड्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर अधिक असून, पदयात्रा, बैठका, संपर्क मोहीम वेगाने सुरू आहेत. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ‘बिग फाईट’ ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

दिग्गज मैदानातअनेक प्रभागांत माजी नगरसेवक आमने-सामने आले आहेत. तसेच माजी आमदारांची पत्नी, सून मैदानात उतरल्या आहेत. या प्रभागांमध्ये निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

नेत्यांचे नातलग रिंगणातमिरजेत आमदार इद्रीस नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार, दिवगंत हारुण शिकलगार, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, माजी आमदार नितीन शिंदे अशा दिग्गज नेत्यांचे नातलग निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याशिवाय राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

अशा आहेत लक्षवेधी लढतीप्रभाग - उमेदवार

  • १ गट अ- रवींद्र सदामते (भाजप)- शेडजी मोहिते (राष्ट्रवादी शरद पवार)
  • १ गट ड - चेतन सूर्यवंशी (भाजप)- विजय घाडगे (राष्ट्रवादी शरद पवार)
  • २ गट ब - प्रकाश ढंग (भाजप)- गजनान मगदूम (राष्ट्रवादी अजित पवार)
  • ३. गट ड - संदीप आवटी (भाजप)- दिगंबर जाधव (राष्ट्रवादी अजित पवार)
  • ६. गट क- अल्लाबक्ष काझी (भाजप)- आझम काझी (राष्ट्रवादी अजित पवार)
  • ६. गट ड - अल्लाबक्ष गाडेकरी (भाजप)- मैनुद्दीन बागवान (राष्ट्रवादी अजित पवार)
  • ७. गट ब- दयानंद खोत (भाजप)- विशाल कलकुटगी (काँग्रेस)
  • ९. गट ड - अतुल माने (भाजप)- मनगू सरगर (राष्ट्रवादी शरद पवार)
  • १०. गट ब - प्रकाश मुळके (भाजप)- अनारकली कुरणे (राष्ट्रवादी शरद पवार)
  • ११. गट ड - मनोज सरगर (भाजप)- हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
  • १२. गट क- संजय यमगर (भाजप)- प्रमोद सूर्यवंशी (काँग्रेस)
  • १२. गट ड- धीरज सूर्यवंशी (भाजप)- अभिजित फार्णे (राष्ट्रवादी शरद पवार)
  • १३. गट क - मीनल पाटील (भाजप)- दीपाली पाटील (काँग्रेस)
  • १४. गट ड - विजय साळुंखे (भाजप)- युवराज बावडेकर (शिंदेसेना)
  • १६. गट ड - उत्तम साखळकर (भाजप)- मयूर पाटील (काँग्रेस)
  • १८. गट क- वैशाली गवळी (भाजप) - स्नेहल सावंत (राष्ट्रवादी अजित पवार)
  • १९. गट ड- संजय कुलकर्णी (भाजप)- युवराज गायकवाड (राष्ट्रवादी शरद पवार)
  • २०. गट क- योगेंद्र थोरात (भाजप)-अतहर नायकवडी (राष्ट्रवादी अजित पवार)
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election: Big fights in 15 wards; key candidates.

Web Summary : Sangli Municipal Corporation election witnesses fierce competition across 15 wards. Former corporators and relatives of prominent leaders are contesting. BJP, NCP (Ajit Pawar), and Congress-NCP (Sharad Pawar) face off, with rebel candidates adding complexity. High-stakes battles are anticipated.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६