दिघंची-हेरवाड राज्यमार्गावरील झाडे जतन करण्याचे मोठे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:17+5:302021-04-05T04:23:17+5:30
गेली तीन-साडेतीन वर्षांपासून दिघंची-हेरवाड राज्य मार्गाचे काम घाटमाथ्यावर अगदी धीम्या गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी या रस्त्याकडेला असणारी पूर्वीची ...

दिघंची-हेरवाड राज्यमार्गावरील झाडे जतन करण्याचे मोठे आवाहन
गेली तीन-साडेतीन वर्षांपासून दिघंची-हेरवाड राज्य मार्गाचे काम घाटमाथ्यावर अगदी धीम्या गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी या रस्त्याकडेला असणारी पूर्वीची माेठमाेठी झाडे ताेडण्यात आली. त्याबदल्यात काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, करंज, निलगिरी व काही जंगली झाडे लावण्यात आली. परंतु या झाडांच्या मशागतीकडे दुर्लक्ष केलेले दिसते. गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यादरम्यान या झाडाचे रोपण करण्यात आले होते. त्यावेळी या भागात पाऊसही चांगला झाल्याने ही झाडेही चांगलीच बळावली आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या झाडांना वेळोवेळी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी बऱ्याच झाडांनी कडक उन्हामुळे माना टाकल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रस्ता बांधकाम विभागाने ही झाडे जतन करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
फोटो : ०४ घाटनांद्रे १
ओळी : दिघंची-हेरवाड राज्यमार्गावर वाघोलीवडादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली झाले कडक उन्हामुळे करपून जात आहेत.