आटपाडी : तालुक्यातील माळी समाजाचे दैवत संत शिरोमणी सावता माळी महाराज मठासमोर सभामंडपाचे भूमिपूजन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.
सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील व जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण भाऊ बालटे यांच्या प्रयत्नातून क वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थानमधून आटपाडीत सावंता माळी महाराज मठासमोर सभामंडपासाठी सुमारे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करत त्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव, बाबासाहेब माळी, पंढरी नागणे, संतोष बालटे, अशोक माळी, भागवत माळी, प्रकाश जाधव, जयसिंग जाधव, ऋषिकेश देशमुख, बजरंग फडतरे, उपसरपंच अंकुश कोळेकर उपस्थित होते.