आष्ट्यात बौद्ध समाजमंदिर तक्क्याचे जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:49+5:302021-01-19T04:27:49+5:30
आष्टा : आष्टा येथील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेला तक्का समाजमंदिर जीर्ण झाल्याने ते पाडण्यात आले. या तक्काच्या नूतन ...

आष्ट्यात बौद्ध समाजमंदिर तक्क्याचे जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
आष्टा : आष्टा येथील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेला तक्का समाजमंदिर जीर्ण झाल्याने ते पाडण्यात आले. या तक्काच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक विजय मोरे, प्रतिभा पेटारे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक भानुदास निंभाेरे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, याठिकाणी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सतत तेवत ठेवणारी वास्तू उभारु.
झुंजारराव पाटील म्हणाले, या तक्क्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिंदे यांचे स्वप्न मंत्री पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यासाठी युवक नेते प्रतीक पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
यावेळी दिलीप वग्यानी, विजय पेटारे, विजय मोरे, प्रतिभा पेटारे, दीपक मेथे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत विजय मोरे यांनी केले. सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले. आनंद हाबळे यांनी आभार मानले. यावेळी सुशील पेटारे, जितेंद्र अष्टेकर, सुजाता वीरभक्त, संदीप वीरभक्त, सुशील भंडारे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
चौकट :
आष्टा शहरातील बौद्ध समाजाच्या या तक्क्यात समाजातील लग्नकार्यासह विविध धार्मिक विधी होत होते. येथे जिल्हा परिषद शाळा होती. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा तक्का समाजाचे वैभव होते. मात्र, काळाच्या ओघात तो जीर्ण झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निधीतून तक्क्याचा जीर्णोद्धार होत आहे.
फोटो -१८०१२०२१-आयएसएलएम-आष्टा न्यूज
आष्टा येथील तक्क्याच्या ठिकाणी नूतन इमारतीचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय मोरे, प्रतिभा पेटारे, झुंजारराव पाटील, दिलीप वग्यानी, विराज शिंदे, माणिक शेळके, विजय पेटारे, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, दीपक मेथे उपस्थित होते.