भोसेत मित्राचा खून करून तुकडे कूपनलिकेत टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:47+5:302021-08-14T04:31:47+5:30

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे मद्यपान करताना शिवीगाळ केल्याने दत्तात्रय शामराव झांबरे (वय २४, रा. भोसे) याचा त्याच्या ...

Bhose murdered his friend and threw the pieces in the coupon line | भोसेत मित्राचा खून करून तुकडे कूपनलिकेत टाकले

भोसेत मित्राचा खून करून तुकडे कूपनलिकेत टाकले

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे मद्यपान करताना शिवीगाळ केल्याने दत्तात्रय शामराव झांबरे (वय २४, रा. भोसे) याचा त्याच्या दोन मित्रांनीच खून केला. २८ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दत्तात्रयच्या खूनप्रकरणी अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर (२७) व सागर सुरेश सावंत (२५, दोघेही रा. भोसे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनी दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेच्या पाईपमध्ये टाकल्याची कबुली दिल्याने ते बाहेर काढण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.

भोसे येथील दत्तात्रय झांबरे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तरुण मित्रांसोबत पार्टीला गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दत्तात्रय बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांच्या चाैकशीत दत्तात्रय याचा खून मित्रांनीच केल्याचे निष्पन्न झाले. भोसे येथे मिरज-पंढरपूर रस्त्यालगत बंद असलेल्या पारस कारखान्यातील मोकळ्या खोलीत दारू व अंडी घेऊन पार्टी करण्यासाठी मृत दत्तात्रय झांबरे व त्याचे मित्र अमोल खामकर, सागर सावंत, वैभवकुमार जाधव हे गेले होते. यावेळी दत्ता झांबरे याने सागर व अमोल यांना सिगारेटचे पाकीट आणायला लावले. सिगारेटचे पाकीट आणायला वेळ लागल्याने सागर व अमोल यांना शिव्या देत दत्तात्रय कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. याचा राग आल्याने सागरने दत्तात्रयच्या हातातील कोयता हिसकावून घेत त्यास लाथ मारून खाली पाडले व त्याच्या अंगावर कोयत्याने सपासप वार केले.

अमोल यानेही त्याच्या डाेक्यात दगड घातला. दत्तात्रय याला ठार मारुन दोघांनी वैभवकुमार जाधव यास दमदाटी केली. ‘आम्ही दत्तात्रयला संपविले आहे, तू येथून जा. याचे काय करायचे आहे ते आम्ही करतो. कोणाला काय सांगितलेस तर तुलाही जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.

दत्तात्रय याच्या खूनप्रकरणी वैभवकुमार जाधव याने ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली असून अमोल खामकर व सागर सावंत यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकल्याची कबुली दिल्याने मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.

चाैकट

क्राैर्याची परिसीमा

मृत दत्तात्रय याचा सागर सावंत हा नातेवाईकच आहे. मात्र, अमोल व सागर यांनी दत्तात्रय याच्या मृतदेहाचे कोयत्याने बारीक तुकडे करून तेथून काही अंतरावर असलेल्या बंद कूपनलिकेत टाकल्याची कबुली दिली. कूपनलिकेच्या खोल पाईपमधून मृतदेहाचे तुकडे काढण्यासाठी दिवसभर पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Bhose murdered his friend and threw the pieces in the coupon line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.