भिवर्गीत दोन लाखांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:17+5:302021-01-08T05:30:17+5:30

संख : भिवर्गी (ता. जत) येथे बेकायदा दारूसाठ्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून १ लाख ९८ हजार २४० रुपयांची ...

Bhivargit seized two lakh liquor | भिवर्गीत दोन लाखांची दारू पकडली

भिवर्गीत दोन लाखांची दारू पकडली

संख : भिवर्गी (ता. जत) येथे बेकायदा दारूसाठ्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून १ लाख ९८ हजार २४० रुपयांची दारू पकडली. महमंदसाहेब लालसाहेब सनदी ( ४५, रा. भिवर्गी) याला याप्रकरणी अटक केली आहे.

पूर्व भागातील भिवर्गी येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अवैध धंदे मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत.

एकजण घराशेजारी बसून दारू विकत असल्याची बातमी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांना मिळाली. त्यांनी संख पोलिसांना छापा टाकण्याचे आदेश दिले. छापा टाकला असता सनदी गावातील ताराप्पा बनसोडे यांच्या घराच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला दारू विक्री करीत असल्याचे दिसून आले. पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले. झडती घेतली असता प्लास्टिक पिशवीत पोत्यात गुंडाळून देशी, विदेशी दारूचे ५९ खोके सापडले. त्याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून एकूण १ लाख ९८ हजार २४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. लाला ढाबा व परमीट बार त्याच्या मालकीचा असल्याचे समजते.

फोटो ओळ : भिवर्गी (ता. जत) येथे बेकायदा दारूसाठ्यासह संशयितास पोलिसांनी अटक केली. या संशयितासमवेत पोलीस पथक.

Web Title: Bhivargit seized two lakh liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.