पुरातील मदतीसाठी भिलवडीत व्यापारी संघटनेचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:03+5:302021-09-02T04:56:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : शासनाने कोणत्याही जाचक अटी न लावता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी ...

पुरातील मदतीसाठी भिलवडीत व्यापारी संघटनेचा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : शासनाने कोणत्याही जाचक अटी न लावता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने बुधवारी व्यवहार बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. व्यापारी संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते तलाठी गौसमहंमद लांडगे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप कोरे, रणजित पाटील, दिलावर तांबोळी, महेश शेटे, दीपक पाटील, जावेद तांबोळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भिलवडी येथील कृष्णा नदीला आलेल्या महापुराला एमहिना उलटून गेला. गावातील व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने तातडीची मदत जाहीर केली. परंतु अजूनपर्यंत कोणालाही मदत मिळालेली नाही. कोरोनाच्या संकटात आधीच डबघाईला आलेल्या व्यापाऱ्याला ताबडतोब आर्थिक मदतीची अपेक्षा असताना शासन मदत करण्यासाठी दिरंगाई करत आहे. याचा सर्व व्यापाऱ्यांनी निषेध केला. व्यापाऱ्यांच्या भावना प्रशासनाने शासनापर्यंत पोहोच कराव्यात या हेतूने सकाळी अकरापर्यंत सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून निवेदन देण्यात आले.
व्यापाऱ्यांना विनाअट, सर्वंकष मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर मदत मिळावी अशा आशयाचे लेखी निवेदन व्यापारी संघटनेच्यावतीने देण्यात आले.