शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:20 IST

भिलवडी : सांगली व सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीसह रोख रक्कम हातोहात गायब करणारा, तसेच बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यात ...

भिलवडी : सांगली व सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीसह रोख रक्कम हातोहात गायब करणारा, तसेच बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी अटक केली. राजेंद्र गणपती केदार (वय ३८ रा. डोणज, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला गुड्डापूर (ता. जत) येथून ताब्यात घेतले होते.त्याच्याकडून विविध चोरींमधील रोख रक्कम व पाच दुचाकी असा सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील लहू रामचंद्र शिंदे यांच्या घराचे कुलूप काढून याने ५० हजार रुपयांची चोरी करून पसार झाला होता. या गुन्ह्याची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस तपासात गुड्डापूर येथे राजेंद्र केदार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी (दि.१७) मार्च रोजी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी