भिडे गुरुजींना मानसोपचाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:07+5:302021-04-09T04:29:07+5:30

सांगली : संभाजीराव ऊर्फ मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. त्यांना सध्या ...

Bhide Guruji needs psychiatric treatment | भिडे गुरुजींना मानसोपचाराची गरज

भिडे गुरुजींना मानसोपचाराची गरज

सांगली : संभाजीराव ऊर्फ मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. त्यांना सध्या मानसोपचाराची गरज आहे. कोरोना हा रोग नाही म्हणणाऱ्या गुरुजींनी कोरोना रुग्णालयात एक दिवस वास्तव्य करून दाखवावे, असे आव्हान स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केली.

ते म्हणाले, संपूर्ण जगात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार सुरू आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्व वैद्यकीय आणि संशोधन यंत्रणा या रोगाचा नायनाट करण्यासाठी संशोधन करीत आहेत. करोडो रुपये खर्च करून लाखो संशोधक या रोगावर ठोस उपचार करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत; मात्र भिडे गुरुजींनी हा रोगच नाही. कोरोनामुळे जी माणसे मरतात, जी जगायला लायक नाहीत, असे बोलून संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह सरकारची कुचेष्टा केली आहे. त्यांच्या व्यक्तव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

ते पुढे म्हणाले की, यापूर्वी त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आजपर्यंत याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले; मात्र आता त्यांनी बेताल वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. कोरोना नाही, असे त्यांचे मत असेल तर त्यांनी कोरोना उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात एक दिवस थांबून दाखवावे.

चौकट

संशोधक, डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अवमान

कोरोनाच्या संसर्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा करीत आहेत. सेवा करताना अनेकांचा जीव गेला आहे; मात्र या सर्वांना कवडीमोल किंमत देऊन भिडे यांनी त्यांचा अवमान केला आहे, असे खराडे, डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: Bhide Guruji needs psychiatric treatment