नेर्ले, कासेगाव, वाटेगाव येथील भावई जोगण्या यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:06+5:302021-07-08T04:18:06+5:30
नेर्ले : बारा बलुतेदार यांचा सहभाग असणारी नेर्ले, कासेगाव, वाटेगाव याठिकाणी भरणारी भावई जोगण्या यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात ...

नेर्ले, कासेगाव, वाटेगाव येथील भावई जोगण्या यात्रा रद्द
नेर्ले : बारा बलुतेदार यांचा सहभाग असणारी नेर्ले, कासेगाव, वाटेगाव याठिकाणी भरणारी भावई जोगण्या यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी व कासेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी दिली.
नेर्ले येथील भावई उत्सवाच्या यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार, दि. ८ असून, यादिवशी फक्त घरगुती स्वरूपात धार्मिक विधी पार पडणार असल्याची माहिती विजय नांगरे पाटील यांनी दिली. यात्रेचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कासेगाव येथील भावई यात्रा दि. १० व ११ रोजी होणार होती. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही यात्रा रद्द केल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग परिट यांनी दिली. यावेळी बाळासाहेब कुंभार, नागेश सन्मुख, नीलेश कोळी उपस्थित होते. यात्रेनिमित्त होणारी जोगाजोगी यांची मिरवणूक व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मते यांनी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत यांना सूचना देऊन संबंधित गावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे यात्रा रद्दबाबत सूचना दिल्या आहेत. यात्रा रद्द झाल्याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.