‘शांतिनिकेतन’मध्ये रंगला भातुकलीचा खेळ
By Admin | Updated: December 1, 2014 00:08 IST2014-11-30T22:36:46+5:302014-12-01T00:08:44+5:30
आजी-अजोबा बालपणीच्या खेळांमध्ये रमून गेले. संगीत खुर्ची, आजीला फेटा नेसविणे, अजोबाने आजीचा मेकअप् करणे, झिम्मा-फुगडी खेळणे असे अनेक गमतीदार खेळ आजी-अजोबा मनापासून खेळले

‘शांतिनिकेतन’मध्ये रंगला भातुकलीचा खेळ
सांगली : नवभारत शिक्षण मंडळ संचलित ले. जन. एस. पी. पी. थोरात अॅकॅडमीमध्ये आज (रविवारी) आजी—अजोबांना तरुण होण्याची संधी मिळाली. निमित्त होते आजी-अजोबा मेळाव्याचे.थोरात अॅकॅडमीतील विद्यार्थी आजी-अजोबा बालपणीच्या खेळांमध्ये रमून गेले. संगीत खुर्ची, आजीला फेटा नेसविणे, अजोबाने आजीचा मेकअप् करणे, झिम्मा-फुगडी खेळणे असे अनेक गमतीदार खेळ आजी-अजोबा मनापासून खेळले. झुकझुक गाडीत बसून आपल्या नातवांसोबत फेरफटका मारण्याचा मनसोक्त आनंद लुटला. रस्सीखेच तसेच अनेक खेळांमध्येही त्यांनी आपले कौशल्य पणास लावले.आपल्या आजी-अजोबांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह पाहून नातवंडेही सुखावली. फनी गेम्स, स्पॉट गेम्स, डोळे बांधून नातू ओळखणे असे अनेक गमतीदार खेळही त्यांनी अनुभवले. उद्घाटन पालक प्रतिनिधी बी. ए. पाटील यांच्याहस्ते झाले. स्वागत स्कूल इनचार्ज सौ. समिता पाटील यांनी केले. सौ. पाटील यावेळी म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात ताण-तणाव येतच राहतात. उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था आजच्या मुलांसाठी धोकादायक आहे. त्यासाठीच अशा कार्यक्रमांचे संयोजन आम्ही केले आहे. संयोजन जीवन कदम, आप्पा पाटील यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक गौतम पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)