भरधाव डंपरने दुकान उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:53+5:302020-12-05T05:07:53+5:30
बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्यासुमारास मणेराजुरीहून तासगावच्या दिशेने भरधाव वेगाने डंपर (एमएच ४२ ए. क्यू. ०९९७) तासगावच्या दिशेने जात होता. ...

भरधाव डंपरने दुकान उडवले
बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्यासुमारास मणेराजुरीहून तासगावच्या दिशेने भरधाव वेगाने डंपर (एमएच ४२ ए. क्यू. ०९९७) तासगावच्या दिशेने जात होता. तहसीलदार निवासस्थानासमोर रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानावर हा डंपर गेला. यात दुकानाचे पूर्णपणे नुकसान झाले. त्यानंतर पुढील बाजूस असणाऱ्या चारचाकी वाहन आणि विजेचे खांबाचे नुकसान झाले. डंपरचालकाचा ताबा सुटला होता. दुकानाची मोडतोड झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित दुकान मालकाने डंपरचालकाचा पाठलाग करून त्याला पोलिसांना माहिती दिली. डंपरचालकाविरोधात ओंकार चंद्रकांत माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेत संबंधित डंपरचालकाला ताब्यात घेतले.
फोटो-०३तासगाव१.२.३