खानापूरच्या उपनगराध्यक्षपदी भारत सरगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:35+5:302021-08-28T04:30:35+5:30
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भारत बापूसाहेब सरगर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ...

खानापूरच्या उपनगराध्यक्षपदी भारत सरगर
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भारत बापूसाहेब सरगर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संतोष भोर व साहाय्यक मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले.
उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर यांनी कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. रिक्त जागी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे यांच्या गटाचे भारत सरगर यांची बिनविरोध निवड झाली.
नूतन उपनगराध्यक्ष भारत सरगर यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा स्वाती टिंगरे, माजी नगराध्यक्ष तुषार मंडले, ज्ञानदेव बाबर, सुनीता भगत, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, नूतन टिंगरे, भारती माने, गटनेत्या मंगल मंडले, उमेश धेंडे, राजेंद्र टिंगरे, रायसिंग मंडले, डी. बी. माने उपस्थित होते.