शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'भारत जोडो'त एक तेरा कदम, एक मेरा कदम, सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:48 IST

आमदार डॉ. विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालणार

कडेगाव : एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए अपना वतन'हा विचार घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत आहे. या यात्रेत सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने सहभागी होत आहेत. पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालणार आहेत. यानिमित्ताने कदम यांच्या बुलडाणा ते सांगली पदयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.जनतेशी संवादाची तार जोडत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड , हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून जात असली तरी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्तेही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या यात्रेत विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील ४ हजार कार्यकर्ते सहभागी होत आहेत. विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमीची संवाद पदयात्रा काढली होती. सन २०१३ मध्ये ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत"एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे"ही टॅग लाईन घेऊन निघालेल्या संवाद पदयात्रेच्या आठवणी भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या यात्रेत सहभागी झालेले बहुतांशी कार्यकर्ते आता पुन्हा भारत जोडो यात्रेतसहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.२०१३ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून  राहुल गांधी यांच्या आदेशानुसार कदम यांनी ही पदयात्रा काढली होती. यावेळी पदयात्रेच्या माध्यमातून  मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आले. ती संवाद पदयात्रा बार्शी येथे आली असताना राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशीसंवाद साधला होता. आता तरदस्तुरखुद्द राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असल्याने कार्यकर्ते अधिक उत्साहाने या यात्रेत सहभागी होत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा