कडेगाव तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:53+5:302020-12-09T04:21:53+5:30
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरासह तालुक्यातील विविध शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष, कडेगाव पाणी संघर्ष ...

कडेगाव तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरासह तालुक्यातील विविध शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष, कडेगाव पाणी संघर्ष समिती आदींनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनीही बंदला जाहीर पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला. रुग्णालये, औषध दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद पाळल्याने शुकशुकाट होता.
कडेगाव शहरासह तालुक्यातील वांगी, नेवरी, चिंचणी, अंबक, शाळगाव, देवराष्ट्रे, शिवाजीनगर, हिंगणगाव बुद्रुक, हिंगणगाव खुर्द, अमरापूरसह बहुतांश गावांत बंदला प्रतिसाद मिळाला. यावेळी केंद्र सरकारच्या शेती विधेयकांना सर्व शेतकरी व शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध केला. केंद्र सरकारने तिन्ही कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. शहरासह तालुक्यात बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
फोटो : ०८ कडेगाव १
ओळ : कडेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती.