शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

By संतोष भिसे | Updated: March 10, 2024 16:24 IST

सांगली-कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची परीक्षा

सांगली : कोल्हापूर ते सांगलीदरम्यान डेमू पॅसेंजर रेल्वेचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला. 

सातारा ते कोल्हापूर-सातारादरम्यान सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेबाबत प्रशासनाची अनास्था संताप आणणारी आहे. डेमूच्या डब्यांमध्ये अस्वच्छता, गाडी विलंबाने धावणे हे प्रकार रोजचेच आहेत. गेल्या काही महिन्यांत डेमू गाडीच्या नादुरुस्त्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. 

शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कोल्हापुरातून सुटलेली सांगली पॅसेंजर रुकडीमध्ये येताच अंधारात बुडून गेली. डब्यांतील वीजपुरवठा बंद झाला. सर्व दिवे आणि पंखे बंद पडले. प्रवाशांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरु करुन उजेडाचा प्रयत्न केला. यादरम्यान, महिला प्रवाशांना चोरीमारीपासून सावध राहण्याची वेळ आली. 

पुढील स्थानकात दिवे सुरु होतील या अपेक्षेने प्रवासी शांत होते, पण प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंधारे डबे तसेच धावत राहिले. हातकणंगले स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी डेमू थांबली. त्यावेळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे कर्मचारी पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सर्व डबे प्रकाशमान झाले.

लाल डेमू भंगारात पाठवाप्रवाशांनी सांगितले की, लाल डेमूचे इंजिन सतत नादुरुस्त होते. सकाळी धावणारी सातारा-कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची आहे. सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार कोल्हापूरला जातात. ही गाडी सकाळी ९.५० वाजता कोल्हापुरात पोहोचण्याची वेळ आहे. पण इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने विलंबाने धावते. पंधरवड्यापूर्वी तर चक्क बारा वाजता पोहोचली होती. बिघाडामुळे तिची गती मंदावली होती. ताशी २०-३० किलोमीटर या गडीने डेमू धावत होती. या गाडीने प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली. 

तिकीट वाढवा, पण चांगली सेवा द्यारेल्वेने कोरोनाकाळात वाढवलेले तिकीटांचे दर नुकतेच पूर्ववत केले. मिरज ते कोल्हापूर हे ३० रुपये प्रवासभाडे पुन्हा १५ रुपयांवर आणले. रेल्वेने प्रसंगी भाडे वाढवले तरी चालेल, पण सेवा चांगली द्यावी अशी प्रवाशांची भावना आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSangliसांगलीkolhapurकोल्हापूर