भाळवणी गाव विकासाचे रोल मॉडेल बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:36+5:302021-02-10T04:25:36+5:30

भाळवणी (ता. खानापूर) येथे २ कोटी ३५ लाखांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बाबर बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती महावीर ...

Bhalwani will be a role model for village development | भाळवणी गाव विकासाचे रोल मॉडेल बनवणार

भाळवणी गाव विकासाचे रोल मॉडेल बनवणार

भाळवणी (ता. खानापूर) येथे २ कोटी ३५ लाखांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बाबर बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सुलभाताई अदाटे, नामदेव चव्हाण, महेश घोरपडे, राजू शिंदे, विठ्ठल घोरपडे, सलीम संदे, नबीलाल पेंटर, ॲड. मुसा मुजावर उपस्थित होते.

बाबर म्हणाले, भाळवणी गाव हे राजकीय दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. परंतु विकासाच्या बाबतीत या गावातील लोक नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात. या गावाने नेहमीच माझ्या राजकीय जडणघडणीत माझ्याबरोबर राहून माझ्यावर विश्वास दाखविला आहे. मी सुद्धा गावच्या विकासासाठी कधीही अंतर दिले नाही. गावात विकासासाठी भरघोस निधी देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गावाला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते दर्जेदार बनवून गावातील दळणवळणच्या सुविधा सुखकर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून विट्याला जाणाऱ्या रस्त्याची दर्जोन्नती करून तो प्रमुख जिल्हा मार्ग केला व त्याची रुंदी वाढवली. भविष्यात गावातील अंतर्गत सर्व रस्ते, पथदीप लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन आमदार अनिल बाबर यांनी दिले.

यावेळी शशिकांत अदाटे, अस्लम मोमीन, जाफर मोमीन, नजरूद्दीन मुजावर, ईलाई मुजावर, सादिक मुजावर, सुबराव धनवडे, हिंदुराव धनवडे, वसंत धनवडे, आशिफ मोमीन, लतिफ भाडलेकर, जालिंदर सूर्यवंशी, पोपटराव शिंदे, विकास धनवडे, कमलेश मगर, आणि भाळवणी गावातील व मुजावर वस्ती येथील नागरिक उपस्थित होते.

फोटो : ०९ विटा १

ओळ : भाळवणी (ता. खानापूर) येथे अडीच कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती महावीर शिंदे, सुलभा आदाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhalwani will be a role model for village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.