शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बाहुबली भक्तिसंध्येने सांगलीकर मंत्रमुग्ध! कृष्णा तिरावर चित्र, नृत्य, गायनाचा अनोखा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 20:22 IST

संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

सांगली : संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी उपस्थिती लावल्याने कृष्णाकाठावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्याला दि. ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली परिसरातील महिला मंडळांनी एकत्र येऊन भगवान बाहुबलींची भक्ती व आराधना करण्यासाठी बुधवारी कृष्णा तिरावर वसंतदादा पाटील स्मारकाशेजारी भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित महिला प्रतिनिधींच्याहस्ते कलशामध्ये धान्य भरून संध्येची सुरुवात करण्यात आली. या संध्येसाठी १००८ महिलांचा सहभाग अपेक्षित होता, तथापि शहरासह परिसरातील विविध महिला मंडळांच्या हजारो सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे एकाचवेळी भगवान बाहुबली यांची भक्तिगीते गायकांकडून सादर होत होती, तर त्याचवेळी राजनेमी नृत्य कला अ‍ॅकॅडमीच्या संचालिका धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या भरतनाट्यम् नृत्य सादर करत होत्या, तर दुसरीकडे कलाविश्व महाविद्यालयातील २५ विद्यार्थी एकाचवेळी भगवान बाहुबली यांचे देखणे चित्र रेखाटत होते. पार्श्वनाथ भक्ती आराधनातर्फे सोनाली देसाई-चौगुले यांनी भक्तिगीते सादर केली. सुरुवातीला प्राकृत भाषेतील गोमटेश स्तुती सादर करण्यात आली. त्यानंतर बाहुबली स्वामी स्तवन सादर करण्यात आले. ‘जय गोमटेश जय गोमटेश, जय बळगोळके जय गोमटेश’ हे स्तवन यावेळी सादर झाले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, शैलजा नवलाई, कांचन कांबळे, कांचन पाटील, नीता केळकर, शैलजाभाभी पाटील, जयश्री पाटील, मीनाक्षी पाटील, अनिता पाटील, चांदणी आरवाडे, राजश्री कांते, जयवंती पाटील, स्वरूपा पाटील, सुनंदा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. गुलाबी रंगाने कृष्णाकाठ रंगलाभक्तिसंध्या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान कराव्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व महिला गुलाबी रंगाची साडी परिधान करून हजर होत्या. एकाचवेळी हजारो महिला भक्तिसंध्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

टॅग्स :Sangliसांगली