वाळवा तालुक्यात भडकंबे, हुबालवाडी ठरले नवे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:41+5:302021-06-23T04:18:41+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सोमवारी नव्या २६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून, शहरी भागातील ...

Bhadkambe, Hubalwadi became new hotspots in Valva taluka | वाळवा तालुक्यात भडकंबे, हुबालवाडी ठरले नवे हॉटस्पॉट

वाळवा तालुक्यात भडकंबे, हुबालवाडी ठरले नवे हॉटस्पॉट

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सोमवारी नव्या २६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून, शहरी भागातील दोघांचा, तर ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे.तालुक्यात भडकंबे आणि हुबालवाडी ही दोन गावे कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आली आहेत. भडकंबेत २५, तर हुबालवाडीत १३ रुग्ण सापडले.

तालुक्याच्या ग्रामीण भागातील संसर्ग दिवसेंदिवस आपले डोके वरच काढत असल्याचे समोर येणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील शहराच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. इस्लामपूरमध्ये ३४ आणि आष्टा शहरात १३ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. पेठ येथे ११, मर्दवाडी आणि कारंदवाडी प्रत्येकी ९, नागाव येथे ८, काळामवाडी येथे ७, नेर्ले, भवानीनगर, कोरेगाव येथे प्रत्येकी ६, साटपेवाडी येथे ५, गोटखिंडी, डोंगरवाडी आणि तांबवे येथे प्रत्येकी ४ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Bhadkambe, Hubalwadi became new hotspots in Valva taluka