शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय : विजया रहाटकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:28 PM

राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

ठळक मुद्देमहिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

सांगली : राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.प्रज्ज्वला योजनेंतर्गत महिला बचत गटांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या सुविद्य पत्नी मंजली गाडगीळ, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, महानगरपालिका महिला व बाल कल्याण सभापती मोहना ठाणेदार, महिला कायदे सल्लागार ॲड. जयश्री पेंडसे, प्रज्ज्वला समितीच्या शालाखा साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला आयोगाकडून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. प्रज्ज्वला योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात 'एक जिल्हा एक वस्तु' असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत.तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी 'बचत गट बाजार' जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. महिलांना न्याय व सन्मान मिळण्यासाठी महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजना, त्यांचे अधिकार व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगून श्रीमती रहाटकर म्हणाल्या, सर्वसामान्य महिला एकमेकीचा हात धरून पुढे जाऊ शकतात. यासाठी बचत गटांची स्थापना करून विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावेत व आर्थिक सक्षमीकरण करावे.उद्योगासाठी बँकेमार्फत मुद्रा योजनेतून एक लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात येणार आहे याचा बचत गटांनी लाभ घ्यावा. काही अडीअडचणी आल्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडीअडचणी सोडवाव्यात. प्रज्ज्वला योजनेमुळे राज्यातील बचत गट आणखी प्रज्वलित व सक्षम होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, राज्य महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांनी महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन बचत गटांचे सक्षमीकरण करावे असे आवाहन केले. तसेच बचतगटांसाठी समुपदेशन केंद्र व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी दिले.

यावेळी प्रज्वला समितीच्या शालाखा साळवी यांनी महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना, अधिकार व कायदेविषयक सविस्तर माहिती उपस्थित महिला बचत गटांना दिली. प्रास्ताविक महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. भारती दिगडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासSangliसांगली