सांगली शासकीय आयटीआयला पुणे विभागात सर्वोत्कृष्ट पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:18+5:302021-08-13T04:30:18+5:30
सांगलीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य यतिन पारगावकर यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

सांगली शासकीय आयटीआयला पुणे विभागात सर्वोत्कृष्ट पुरस्कार
सांगलीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य यतिन पारगावकर यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पुणे विभागात सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर झाला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने पुरस्काराची घोषणा केली.
उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात संस्थेने मोलाचा सहभाग नोंदविल्याचे संचालनालयाने म्हटले आहे. तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे, योजनाबद्ध प्रशिक्षणाद्वारे आस्थापनांचा दर्जा उंचावणे, गुणवत्ता व उत्पादन वाढविणे या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी संस्था कार्यरत असल्याबद्दल कौतुक केले आहे.
हा पुरस्कार सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी आहे. त्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयाने नामांकने मागविली होती. त्यातून पुणे विभागासाठी सांगली संस्थेची निवड झाली. प्राचार्य यतिन पारगावकर आणि उपप्राचार्य वसंत घागरे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल, शिस्तबद्ध प्रशासकीय कामकाज आदी मुद्द्यांच्या बळावर पुरस्कार मिळाला. संस्थेत २४ व्यवसायांच्या ८३ तुकड्यांमधून १ हजार १६० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षित केले जाते. प्रशिक्षणासोबतच लोकाभिमुख प्रकल्पही राबविले जातात. याची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली.