शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सांगलीत दोन दिवसांत एसटीकडून सव्वा लाख ‘महिलांचा सन्मान’, उत्पन्नात 'इतक्या' लाखांची पडली भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:58 IST

प्रवासी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण, गर्दी वाढली

सांगली : राज्य शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी सुरू केली. महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन दिवसांत सांगली विभागातील दहा एसटी आगारांमधून एक लाख २० हजार महिला प्रवाशांनी ‘सन्मान’चा ५० टक्के सवलतीत प्रवास केला आहे. ५० टक्के सवलतीच्या दराने मिळालेल्या तिकिटांमुळे प्रवासी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एसटीच्या उत्पन्नातही ६० लाख ५८ हजार २४० रुपयांची भर पडली आहे.राज्य शासनाने अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी आठवडाभरातच सुरू केली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या साधी, मिनी, निमआराम, विनावातानुकूलित स्लिपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासात ही सवलत लागू झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांची एसटीकडे गर्दी वाढली आहे. शनिवारी एका दिवसात ६२ हजार ५८१ महिलांनी प्रवास केला असून, त्यापासून ५० टक्के तिकीट दरानुसार १४ लाख ७५ हजार ८७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

शासनाकडून उर्वरित ५० टक्के रक्कम एसटीला मिळणार आहे. रविवारी पुन्हा ५६ हजार ९८७ महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला असून, १५ लाख ५३ हजार २४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तेवढीच रक्कम शासनाकडून मिळणार आहे. दोन दिवसांत एसटीला शासनाकडून मिळणाऱ्या रकमेसह ६० लाख ५८ हजार २४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, असे एसटी महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. याचा परिणाम लगेच प्रवासी संख्येच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

खासगी बसेसकडून पुन्हा एसटीकडेराज्यभरात ही सवलत लागू असल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा या मार्गावरील प्रवासी महिलांचा ओढा एसटीकडे वाढला. आरामदायी बसेसच्या तुलनेत हा खर्च निम्म्यावर आल्याने या महिलांनी खासगी बसेसपेक्षा एसटीला पसंती दिली. तसेच वातानुकूलित, स्लिपर वाहनांनाही सवलत असल्याने एसटी प्रवासाकडे आपोआप ओढा वाढत आहे.आगारनिहाय महिला प्रवासी संख्याआगार - प्रवासी - उत्पन्नसांगली - १२,४८२ - ४,९४,७६२मिरज - १०,५१९ - ३,८५,४८६इस्लामपूर - १७,४१७ - ३,३२,१३३तासगाव - १४,०९२ - ३,०५,५३९विटा - १४,८८१  - २,७१,३२७जत - ९,०२१ - ३,२६,४३७आटपाडी - ९,०१४ - २,३७,३५१कवठेमहांकाळ - ९,०८७ - २,५३,५५६शिराळा - १३,६६८ - २,५२,०६२पलूस - ८,३८७ - १,६७,४३७एकूण - १,१९,५६८ - ३०,२९,१२०

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिला