शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप 

By संतोष भिसे | Updated: March 16, 2024 18:09 IST

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले ...

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. सांगलीत २३ मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या तयारीसाठी आज, शनिवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे बैठक झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.शेटफळे (ता. आटपाडी), घाटनांद्रे, तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी, नागाव कवठे (ता. तासगाव) येथेही बैठका झाल्या. त्यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी मार्गदर्शन केले. देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला किंवा धार्मिक स्थळे जोडण्याला आमचा विरोध नाही. पण हजारो एकर जमीन महामार्गात जाऊन शेतीवर नांगर चालणार असेल, तर महामार्ग कशासाठी? हा प्रश्न आहे.खराडे म्हणाले, महामार्गाला विरोधासाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आहेत. सांगलीतील शनिवारच्या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आजवर पवनचक्क्या, रत्नागिरी- नागपूर महामार्ग, राज्यमार्ग, गुहागर-विजापूर महामार्ग यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत, पण त्यातून ते सुखी झालेले नाहीत. आता शासनाने शक्तिपीठच्या रुपाने नवे संकट लादू नये. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनीही महामार्गाविरोधात तीव्र भूमिका व्यक्त केल्या. बैठकीला प्रभाकर पाटील, सुनील पवार, पी. वाय. भोसले, गुलाम मुलाणी, किशोर कोडग, शरद पवार, भालचंद्र कोडग, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, विशाल गायकवाड, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, गुलाबराव गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

आता कोठे चांगले दिवस येताहेत..साखळकर म्हणाले, महामार्गामुळे नदीकाठच्या गावात महापुराचे संकट गडद होणार आहे. कोणीही मागणी केलेली नसताना नव्या शक्तिपीठ महामार्गाचे प्रयोजन काय? याचे उत्तर शासनाने द्यावे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील शेतीमध्ये सोने पिकू लागले आहे. तेथे महामार्गासाठी नांगर चालविण्याचे पाप शासनाने करु नये. महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी