राष्ट्रवादीच्या विस्ताराचा आगामी निवडणुकांमध्ये लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:26+5:302021-08-23T04:29:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिराळा मतदारसंघात विस्तार होत आहे. ही वाढ आगामी जिल्हा परिषद, पंचायत ...

राष्ट्रवादीच्या विस्ताराचा आगामी निवडणुकांमध्ये लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिराळा मतदारसंघात विस्तार होत आहे. ही वाढ आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायतीसह सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असा विश्वास आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
चिखली (ता. शिराळा) येथे आरळा व सोनवडे येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा आमदार नाईक यांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. सुनीतादेवी नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, भूषण नाईक प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू आहेत. राज्यात महाआघाडी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत. विरोधकांना लागलेली गळती रोखणे अवघड आहे.
माजी सरपंच निलोफर डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आरळा येथून हसिना मुल्ला, पूनम भोसले, निर्मला भोसले, संगीता भोसले, साधना गुंजाळ, शशिकला भोसले आदींसह सहा महिला कार्यकर्त्या; तर सोनवडे येथून संगीता बाबर, मनीषा बाबर, कमल बाबर, मीना खंडागळे व सुनीता पाटील यांच्यासह २६ महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी उपसरपंच सदाजी पाटील, अनिता चौगुले, राम बडदे, कोंडिबा चौगुले, बाबुराव कळंत्रे, विशाल पाटील, किरण पाडळकर आदी उपस्थित होते.