शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, सांगली जिल्ह्यातील चौदा बहिणींनी पैसे नाकारले; संख्या वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:13 IST

जिल्ह्यात ७.७३ लाख लाडक्या बहिणी

सांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी होणार आहे. त्याची धास्ती जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून, बुधवारपर्यंत १४ लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करीत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून पात्र महिलांना महिना १५०० रुपये दिले होते. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा सरकारचा उद्देश होता. जिल्ह्यात सात लाख ७३ हजार लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ज्या पात्र नाहीत त्यांनीही अर्ज करून लाभ घेतला आहे.

राज्य शासनाने पात्र महिलांना लाभ देण्याचे संकेत दिले आहेत. पण, विधानसभा निवडणुका संपल्यामुळे राज्य शासनाने अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४ लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याणच्या अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली.

कुठे करता येणार अर्ज?योजनेच्या निकषानुसार अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींना लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद यांच्या नावाने अर्ज करून या योजनेचा लाभ सोडता येणार आहे.

मिरज तालुक्यातून सर्वाधिक दोन लाखांवर अर्जमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सर्वाधिक दोन लाख अर्ज हे मिरज तालुक्यातून आले आहेत. यामध्ये अनेक अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, जिल्हा समितीकडून अपात्र महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आहेत.

लाभाची वसुली नाहीलाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहा हप्त्यांचे वितरण झाले आहे. अपात्र लाभार्थ्यांनीही त्याचा लाभ घेतला आहे. दरम्यान, योजनेचा लाभ सोडणाऱ्या महिलांकडून कुठल्याही प्रकारची वसुली होणार नसून, यापुढे लाभ देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अपात्रतेचे निकषज्या महिलांचा परिवार आयकर भरतो, ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असलेल्या १४ महिलांनी अर्ज करून योजनेचा लाभ सोडला आहे. जिल्ह्यातील अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज करावा. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांना देण्यात येणार आहे. - वृषा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा