बेळगाव नामांतर; मिरजेत विरोध

By Admin | Updated: October 18, 2014 23:47 IST2014-10-18T23:47:40+5:302014-10-18T23:47:40+5:30

कार्यकर्त्यांची बैठक : मोदी सरकारचा निषेध

Belgaum nomination; Conflicts of Mirage | बेळगाव नामांतर; मिरजेत विरोध

बेळगाव नामांतर; मिरजेत विरोध

मिरज : राष्ट्रवादी युवक काँग्रेस मिरज तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रातील मोदी सरकारच्या बेळगावच्या नामांतरास मंजुरीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बेळगावी करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावाला मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कारस्थान केले आहे.
स्वीस बँकेमध्ये असणाऱ्या काळ्या पैशाचे खातेदारांची नावे माहिती उघड करणे शक्य नसल्याचे मोदी सरकारने स्पष्ट करून आधीच्या व सध्याच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही, हे देशाला दाखवून दिले आहे. भविष्यकाळात भारतीयांच्या परदेशातील काळ्या पैशाची माहिती त्या-त्या देशामधील सरकार देणार नाहीत. या बहाण्याने मोदी सरकार काळ्या पैसेवाल्यांना पाठीशी घालत असल्याची टीका तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली.
ते म्हणाले, मोदी सरकारने मराठी अस्मितेवर घाला घातला आहे. बेळगावसाठी महाराष्ट्राचा अनेक वर्षे लढा सुरू आहे. असे असताना केंद्राने कर्नाटकाच्या बाजूने निर्णय देणे अन्यायकारक आहे. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले. बैठकीस गंगाधर तोडकर, बाळासाहेब माळी, अनिता कदम, महेश सलगरे, एकनाथ जाधव, परशुराम बनसोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Belgaum nomination; Conflicts of Mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.