शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा: कोल्हापूरसह साताऱ्यातही केली होती ‘रेकी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:52 IST

इतर सात जण अद्याप पसार 

सांगली : सांगलीत जून महिन्यात रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यापूर्वी मास्टरमाइंड सुबोध सिंग याच्या टोळीने सांगलीसह कोल्हापूर व सातारा येथील रिलायन्स ज्वेल्सची ‘रेकी’ केली होती. कोल्हापूर व सातारामधील शॉपी दरोड्यासाठी योग्य नसल्यामुळे सांगलीला ‘टार्गेट’केले. तशातच रविवार सुटीचा दिवस, मुख्य रस्त्यावर पाइपलाइनच्या कामामुळे रस्ता बंद, दुपारची सामसूम पाहूनच दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले.दरम्यान, पोलिसांनी सुबोध सिंग, मोटारीचा चालक अंकुर प्रतापसिंग व तिसरा संशयित मोहम्मद शमशाद मोहम्मद मुख्तार या तिघांना अटक केली आहे. इतर सात जण अद्याप पसार आहेत.पोलिस तपासातून मिळालेली माहिती अशी, बिहारमधील पाटणा येथील बेऊर कारागृहामध्ये असलेल्या ज्वेलथीफ सुबोध सिंग याने कारागृहामधूनच दरोडेखोरांची टोळी बनवली होती. याच टोळीला त्याने मोबाइलवरून सांगलीसह सातारा व कोल्हापूर येथील रिलायन्स ज्वेल्सची माहिती दिली होती. तिन्ही ठिकाणच्या ज्वेल्सची टोळीने ‘रेकी’ केली. कोल्हापूर येथील शॉपी दुसऱ्या मजल्यावर होती. तर, सातारा येथील ज्वेल्सपासून पोलिस ठाणे जवळ होते. कोल्हापूर व सातारा येथे दरोडा टाकणे धोक्याचे असल्यामुळे सांगलीला पसंती दिली. त्यानंतर सांगलीत मिरजेकडे जाणारा रस्ता बंद असल्यामुळे सामसूम परिस्थितीचा फायदा घेत दरोडा टाकला.स्थानिक गुन्हे अन्वेषण व विश्रामबागच्या पथकाने कसून तपास करत टोळीतील चौघांची नावे निष्पन्न केली. अंकुर प्रतापसिंग याला प्रथम ओडिशा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तपासात सुबोध सिंग टोळी असल्याचे स्पष्ट झाले. सुबोध सिंगला देखील नुकतेच अटक केली. त्यानंतर तिसरा दरोडेखोर मोहम्मद मुख्तार याला अटक केली. त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अद्याप सात जण पसार आहेत. सांगलीतील दरोड्यात नऊ जणांचा सहभाग होता. तर, सुबोधसिंगने कारागृहातून सूत्रे हलवल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुबोधसिंग व मुख्तार या दोघांना वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवले आहे. मुख्तार हा दरोड्यापूर्वी काही दिवस अगोदर बेऊर कारागृहात खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात आतमध्ये गेला होता. तेथे सुबोध सिंगच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याला टोळीत सहभागी करून घेतले. दरोड्यातील संशयित प्रताप राणा याने त्याच्याशी संपर्क साधून दरोड्यात सहभागी करून घेतले. मुख्तार हा रिलायन्समधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे. त्याने अधिकारी, कर्मचारी यांचे हातपाय बांधून दागिने गोळा केले होते.

सुबोध सिंगला ‘एनडीए’त जायचे होतेसुबोध सिंग हा बारावी उत्तीर्ण आहे. त्याचे आई-वडील शेती करतात. तो सधन कुटुंबातील आहे. त्याला बारावीनंतर ‘एनडीए’मध्ये जायचे होते. परंतु, तिकडे जाता आले नसल्याने तो नंतर गुन्हेगारीकडे वळाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी