शेतजमिनीच्या वादातून बेडगेत कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:56+5:302021-05-28T04:20:56+5:30

मिरज : तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच दोन कुटुंबांत दगड व काठ्यांनी हाणामारीत दोघे जखमी झाले. याबाबत भारत ...

Bedge family quarrels over farm land dispute | शेतजमिनीच्या वादातून बेडगेत कुटुंबात हाणामारी

शेतजमिनीच्या वादातून बेडगेत कुटुंबात हाणामारी

मिरज : तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच दोन कुटुंबांत दगड व काठ्यांनी हाणामारीत दोघे जखमी झाले. याबाबत भारत बापू विटेकर (वय ४८, रा. नरवाड), सौ. रंजना बापू विटेकर (वय ४०) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

विटेकर कुटुंबात बेडग येथील शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. दोघा लहान बहिणींना जमिनीचा हिस्सा मिळण्यासाठी मोठी बहीण शालन हिने न्यायालयात दावा दाखल केला आहे. तोंडी वाटणीपत्रक आम्हाला मान्य नाही म्हणून बाबू आप्पू विटेकर, लक्ष्मण बापू विटेकर यांनी मारहाण करून जखमी केल्याची भारत विटेकर यांची तक्रार आहे. तोंडी वाटणीपत्र मान्य नसल्याने भारत विटेकर, पती बापू विटेकर, दीर बाबू व लक्ष्मण हे वाटणीपत्रकाबाबत बोलत असताना त्यांना मारहाण केल्याचे सरिता विटेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bedge family quarrels over farm land dispute