शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

By संतोष भिसे | Updated: March 5, 2024 13:56 IST

मणेराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात; एकरी दोन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

संतोष भिसेसांगली : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा महामार्ग कोणत्या गावांतून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले. कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांतून ८०२ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. तो सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतून जाणार आहे. कवठेमहांकाळमधील जमिनी दुष्काळी आहेत. तासगाव आणि मिरज तालुक्यांतील जमिनी मात्र सुपीक आणि नदीकाठच्या आहेत. सध्या तेथे हजारो टन ऊस, द्राक्षे, हळद आदी बागायती पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा मोठा आहे. आता महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार आहे. ऊस व द्राक्षपट्टा उद्ध्वस्त होणार आहे.भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे. शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत आक्षेप घेऊ शकतात, पण प्रकल्प अडवू शकत नाहीत. त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला, तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भरभक्कम भरपाई मिळाली. त्यानंतर सरकारने भरपाईच्या नियमात बदल केले, त्यामुळे शक्तीपीठसाठी तितक्या भरपाईची शक्यता नाही. महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी दोन कोटी रुपयांसाठी वज्रमूठ केली आहे. महापालिका क्षेत्रात एकरी चार कोटींची मागणी आहे.दरम्यान, महामार्गाची आणि भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्याने महामार्ग क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध लागू झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील या गावांत भूसंपादनकवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी. तासगाव तालुका : सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

सर्वाधिक संपादन मणेराजुरी, कवलापुरातमणेराजुरीमधील १५२ गट संपादित केले जाणार आहेत. गव्हाण ११, सावर्डे १, मतकुणकी ३९, नागावकवठे १००, वज्रचौंडे ४७, अंजनी ५६, सावळज, सिद्धेवाडी ३ गट संपादित केले जातील. सांगलीवाडीत ५३, पद्माळेत ४४, कर्नाळमध्ये ६५, माधवनगरमध्ये १०७, बुधगावमध्ये ९६ व कवलापुरात १४५ गटांमध्ये भूमीसंपादन होईल. डोंगरसोनीमध्ये ६२, घाटनांद्रेमध्ये १०३, तिसंगीमध्ये ५१ गटांतील शेती घेतली जाणार आहे.

आज सांगलीत, उद्या कवलापुरात बैठकशक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीत मंगळवारी (दि. ५) आयोजित केली आहे. पंचमुखी मारुती रस्त्यावर कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होईल. स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयोजन केले आहे.दुसरी बैठक कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी (दि. ६) होणार आहे. सिद्धेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता शेतकरी एकत्र येतील. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने आयोजन केले आहे. दोन्ही बैठकांत महामार्गासाठी भूसंपादन व भरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे. संयोजक दिगंबर कांबळे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी