सांगलीतील आमराईचे सौंदर्य खुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:26+5:302021-08-27T04:29:26+5:30
सांगली : महापुरामुळे शहरातील आमराई उद्यानाचे मोठे नुकसान झाले होते. आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध संकल्पना राबवित उद्यानाच्या सौंदर्यात ...

सांगलीतील आमराईचे सौंदर्य खुलले
सांगली : महापुरामुळे शहरातील आमराई उद्यानाचे मोठे नुकसान झाले होते. आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध संकल्पना राबवित उद्यानाच्या सौंदर्यात नव्याने भर टाकली आहे.
व्हर्टिकल गार्डन, कारंजा, सेल्फी पाॅईंट, पथदिवे, खुली अभ्यासिका अशी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे उद्यानाचे रूपच बदलून गेले आहे.
फोटो ओळी :
१. उद्यानात प्रवेश करताच ‘लव्ह आमराई’चा फलक नागरिकांचे आकर्षण ठरले आहे. २. दक्षिण बाजूला शोभेचे दिवे उभारले आहेत. ३. व्हर्टिकल गार्डनचा नवा प्रयोगही उद्यानात केला आहे. ४. सेल्फीसाठी पानाची प्रतिकृती उभारली आहे. ५. वृक्षांना जपण्याचा संदेश देणारे शिल्प. ६. मुलांसाठी खुली अभ्यासिका. ७. लोखंडी कमानीचे परघोल उभारले आहेत. (छाया : सुरेंद्र दुपटे)