मिरज (जि. सांगली) : जिथे श्रद्धेला कलात्मकतेची साथ मिळते, तिथे भक्तीचं रूपही काहीसं वेगळंच भासतं. याच भक्तीची व कलात्मकतेची प्रचिती यंदा मिरजकरांना आली ती शिवरत्न मित्रमंडळाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून. मंडळाने यंदा चक्क चहा पावडरपासून सुंदर गणराय साकारले आहेत.मिरजेतील शिवरत्न मित्रमंडळाने यंदा चहा पावडरपासून बाप्पा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. चहा म्हणजे दररोजच्या जीवनातील एक ऊर्जा. त्याच चहा पावडरचा वापर करून तयार झालेली ही साडेतीन फूट उंचीची मूर्ती केवळ एक कलाकृती नाही, तर ती श्रम, श्रद्धा आणि संकल्प यांचा संगम आहे. शिल्पकार शिवाजी पाटील यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही मूर्ती जणू ‘चहा’ या जीवनातल्या साध्या गोष्टीतूनही ‘देवत्व’ प्रकट होऊ शकतं, हेच सांगते. या अनोख्या मूर्तीच्या दर्शनासाठी मिरजमध्ये भक्तांची रीघ लागली आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शिवरत्न मंडळाने पुन्हा एकदा भक्तीला कल्पकतेची जोड दिली आहे.आसाममधील चहाच्या मळ्यांचा देखावामंडळाने या मूर्तीला साजेशी भव्य आणि सुंदर सजावट केली आहे. आसामच्या चहा बागांचा देखावा उभा करून त्यांनी एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती केली आहे. यातून शांतता आणि निसर्गप्रेम जागं होतं.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/2198832487282229/}}}}