आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST2021-01-16T04:31:20+5:302021-01-16T04:31:20+5:30

आष्टा : आष्टा येथील नदीम जहांगीर मुजावर (वय १९. रा. आझाद मोहल्ला आष्टा) याला पूर्ववैमनस्यातून हातोडा व बांबूने मारहाण ...

Beating a youth out of prejudice in Ashta | आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून युवकाला मारहाण

आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून युवकाला मारहाण

आष्टा : आष्टा येथील नदीम जहांगीर मुजावर (वय १९. रा. आझाद मोहल्ला आष्टा) याला पूर्ववैमनस्यातून हातोडा व बांबूने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी घडली.

नदीम मुजावर हा वग्यानी प्लॉट येथे इलेक्ट्रिशियनचे काम करीत असताना रोहित फारणे व अवधूत सावंत (दोघे रा. आष्टा) हे मोटारसायकलवरून आले. त्यांनी नदीम मुजावरकडे पाहून 'तुला मस्ती आली आहे, तू मोठा डॉन झाला आहेस' असे म्हणून त्याला शिवीगाळ सुरू केली. रोहित फारणे याने नदीम याला ढकलून देऊन खाली पाडले व हातोड्याने पाठीवर हल्ला केला. अवधूत सावंत याने घटनास्थळी पडलेला बांबू घेऊन मारहाण केली. दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नदीम मुजावर याने आष्टा पोलिसांत दिली आहे. अधिक तपास हवालदार काकतकर करीत आहेत.

Web Title: Beating a youth out of prejudice in Ashta