कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:37+5:302021-07-29T04:26:37+5:30
सांगली : अंकली (ता. मिरज) येथे कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात धरुन तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चेतन ...

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
सांगली : अंकली (ता. मिरज) येथे कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात धरुन तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चेतन फडतरे हा जखमी झाला असून, याप्रकरणी चेतन संजय फडतरे (रा. इनामधामणी) यांनी विशाल ननवरे (रा. सावंत प्लॉट, सांगली) व आकाश बलगनावर (रा. शंभरफुटी रोड, सांगली) यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी चेतन यांचे शंभरफुटी रोडवर शिवशंभो स्पेअरपार्ट व गॅरेज आहे. यात संशयित विशाल हा कामाला होता. त्याला दिलेले १ हजार रुपये परत न दिल्याच्या कारणावरुन विशालला चेतनने कामावरुन काढून टाकले होते. याचा राग मनात धरुन संशयितांनी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ चेतनला शिवीगाळ करत मारहाण करुन जखमी केले तर दुसऱ्या संशयिताने लाथाबुक्क्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संशयितांवर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.