आरगमध्ये एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST2021-06-11T04:19:29+5:302021-06-11T04:19:29+5:30

दादू व पांडुरंग यांच्यात वाद होऊन पांडुरंग यांनी दादू यांना धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी दि. ८ ...

Beating one in Arg | आरगमध्ये एकास मारहाण

आरगमध्ये एकास मारहाण

दादू व पांडुरंग यांच्यात वाद होऊन पांडुरंग यांनी दादू यांना धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी दि. ८ रोजी दादू गेल्यानंतर दादू यांनी पांडुरंग यांना "तू मला का धमकी दिली" अशी विचारणा केल्याने पांडुरंग यांनी दादू यास दगडाने मारहाण केल्याची तक्रार आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना अटक

मिरज : विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या श्रीशैल राम राजमाने (वय २८, रा. सुभाषनगर) व अनिस अल्ताफ सौदागर (२४, राम शिंदे हॉलजवळ, सुभाषनगर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

सुभाषनगर परिसरात गस्त घालताना घरफोडी करणारे दोघेजण सुभाषनगर भागात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी टोळी निर्माण करून अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पथकाने दोघांना अटक केली असून, याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

Web Title: Beating one in Arg