बिळाशीत महिलेस मारहाण; पाचजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:04+5:302020-12-14T04:39:04+5:30

कोकरुड : बिळाशी (ता. शिराळा) येथे पूर्ववैमनस्य व जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीत एका महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ...

Beating a lazy woman; Five have been charged | बिळाशीत महिलेस मारहाण; पाचजणांवर गुन्हा दाखल

बिळाशीत महिलेस मारहाण; पाचजणांवर गुन्हा दाखल

कोकरुड : बिळाशी (ता. शिराळा) येथे पूर्ववैमनस्य व जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीत एका महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संशयित पाच जणांवर कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शकुंतला कृष्णाजी पाटील (वय ६०, रा. येळाने, ता. शाहुवाडी, सध्या रा. बिळाशी, ता. शिराळा) या भाऊ बळवंत पाटील यांच्यासह बिळाशी येथील घरातील साहित्य घेऊन जात असताना, भावकीतील विलास अाकाराम रोकडे हा शिव्या देत घराबाहेर आला. ‘शिव्या का देतोस’ असे विचारले असता, संशयित विलास रोकडे, अंकुश विलास रोकडे, सुनंदा विलास रोकडे, सारजाबाई आकाराम रोकडे, मंगल सुरेश रोकडे यांनी शिवीगाळ करत शकुंतला पाटील व बळवंत पाटील यांना लोखंडी गजाने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण गेली. यामध्ये डोक्यास मार लागल्याने शकुंतला पाटील व बळवंत पाटील यांच्यावर सांगली येथे उपचार करण्यात आले.

संशयित पाचही जणांवर कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हिंदुराव पाटील तपास करत आहेत.

Web Title: Beating a lazy woman; Five have been charged