चॉकलेटचे पैसे मागितल्याने बेकरीचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:14+5:302021-03-19T04:26:14+5:30

-------------------- सोशल मीडियावर व्हिडीओ; दोघांना मारहाण मिरज : इन्स्ट्राग्रामवर व्हिडीओ टाकल्याच्या कारणावरुन मिरजेत शनिवार पेठेत दोघांना तिघांनी मारहाण ...

Beaten baker for asking for chocolate money | चॉकलेटचे पैसे मागितल्याने बेकरीचालकाला मारहाण

चॉकलेटचे पैसे मागितल्याने बेकरीचालकाला मारहाण

--------------------

सोशल मीडियावर व्हिडीओ; दोघांना मारहाण

मिरज : इन्स्ट्राग्रामवर व्हिडीओ टाकल्याच्या कारणावरुन मिरजेत शनिवार पेठेत दोघांना तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी प्रतीक तोरसकर याने आदिल इम्रान मणेर, अमन इम्रान मणेर व शहनुद्दीन (सर्व रा. सतारमेकर गल्ली, मिरज) यांच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रतीक हा मित्रासमवेत घरासमोर थांबला असताना आदिलसह तिघेजण तेथे आले. त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडीओबाबत जाब विचारत शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी प्रतीक याचा मित्र व आईने मध्यस्थी केली. यावेळी आदिल अमनसह तिघांनी प्रतीकचा मित्र आदित्य याला मारहाण करून आईलाही दगडाने मारहाण केल्याचे प्रतीक याने फिर्यादीत म्हटले आहे.

--------------------

खूनप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

मिरज : करोली (ता. मिरज) येथे सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी नितीन वसंत इंगवले-देशमुख (वय ४०) याला दिनांक २२ मार्चपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. द्राक्ष बागेत येणाऱ्या मजुरांना शिवीगाळ केल्याच्या कारणातून मनोज वसंत इंगवले-देशमुख या आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात सळीने मारुन नितीनने त्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नितीनला मणेराजुरी येथून बुधवारी अटक केली. नितीनला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.

Web Title: Beaten baker for asking for chocolate money