मानसिंग बँक सहकारातील दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:01+5:302021-01-03T04:28:01+5:30

मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कराड शाखेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार ...

Beacon in Mansingh Bank Cooperation | मानसिंग बँक सहकारातील दीपस्तंभ

मानसिंग बँक सहकारातील दीपस्तंभ

मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कराड शाखेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जे. के. बापू जाधव प्रमुख उपस्थित होते.

आमदार आनंदराव पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र अडचणीत असतानासुद्धा जे. के. बापू जाधव यांनी मानसिंग बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.

सुरेश हाळवणकर म्हणाले, तज्ज्ञ संचालक मंडळ, प्रामाणिक सेवकवर्ग व या सर्वांना आदराची वागणूक देणारे बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव हेच बँकेच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

यावेळी बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी बँकेला मिळालेल्या विविध पुरस्कार व ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शीतल सावळवाडे, भाऊसाहेब ढेबे, दीपक भोसले, सागर सूर्यवंशी, हणमंत कराळे, प्रमोद जाधव, किरण चव्हाण, सचिन पाटील, उमेश लाड, सतीश रामुगडे , ॲड. ज्ञानदेव जाधव, शिवाजी नलवडे, सीताराम कुंभार आदी उपस्थित होते.

बँकेचे शाखाधिकारी अभिजित कत्ते यांनी स्वागत केले. शांताराम साळुंखे यांनी आभार मानले.

फोटो-०२दुधोंडी१

Web Title: Beacon in Mansingh Bank Cooperation