शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Sangli: मुलीचा बाप व्हा, वर्षभर मोफत दाढी-कटिंगचा लाभ घ्या; नातीच्या जन्माच्या आनंदात सुभाष कोरेंचा विधायक उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:38 IST

दुकानासमोर ‘मुलगी झाली हो’ उपक्रमाची माहिती देणारा डिजिटल फलक लावला

संजयकुमार गुरवडफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील शुभरत्न जेन्ट्स पार्लर या सलूनचे मालक सुभाष कल्लाप्पा कोरे यांच्या मुलाला मुलगी झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. नातीच्या जन्माच्या आनंदात काेरे यांनी डफळापुरात संपूर्ण वर्षभरात जन्माला येणाऱ्या मुलींच्या वडिलांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा संकल्प केला. गेल्या अकरा महिन्यांपासून ते डफळापूर पंचक्रोशीत जन्माला आलेल्या मुलींच्या वडिलांची दाढी व केस कटिंग मोफत करत आहेत.या उपक्रमाचा डफळापूर पंचक्रोशीतील शंभरावर मुलींचे वडील लाभ घेत आहेत. पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या डफळापुरातील मुख्य पेठेत गेल्या अठरा वर्षांपासून सुभाष कोरे यांचे शुभरत्न जेन्ट्स पार्लर हे सलून दुकान आहे. त्यांना दोन मुले आहेत. माेठा मुलगा अमोल यांना दोन मुले आहेत. दुसरा मुलगा अनिल यांना २६ जानेवारी २०२३ ला मुलगी झाली. प्रजासत्ताक दिनी मुलीच्या रूपाने घरी लक्ष्मी आली. आपल्या कुटुंबात मुलगी झाल्याने कुटुंबात आनंद झाला.यानिमित्ताने कोरे कुटुंबाने डफळापूर पंचक्रोशीमध्ये ज्या घरी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या वडिलांची वर्षभर दाढी-कटिंग मोफत करण्याचा संकल्प केला. उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या दुकानासमोर ‘मुलगी झाली हो’ उपक्रमाची माहिती देणारा डिजिटल फलक लावला. त्यानंतर गेल्या अकरा महिन्यांपासून मुलींच्या वडिलांची दाढी व कटिंग मोफत करण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक मुलींच्या वडिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.कोरे कुटुंबात पिढीजात वारकरी परंपरा आहे. सुभाष कल्लाप्पा कोरे हे माळकरी असून वर्षानुवर्षे पंढरीची वारी करीत आहेत. त्यांची दोन्ही मुलेही सामाजिक कार्यात सहभागी असतात. आपल्या सलूनमध्ये ते गेली दहा वर्षे मुलींचे जावळ मोफत काढत आहेत. यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईच्या राष्ट्रीय जनसेवा पक्षाने सुभाष कोरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. सध्या मुलींची संख्या कमी आहे. मुलीच्या जन्माने कुटुंबात आनंद निर्माण व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवीत आहाेत. मुली जन्माला याव्यात, याचे प्रबोधन व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकीतून सर्व समाजबांधवांच्या हातून असे कार्य घडावे. - सुभाष कोरे

टॅग्स :Sangliसांगली