Be prepared for disease prevention: Eknath Shinde | हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप
हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप

ठळक मुद्देसाथ रोग प्रतिबंधासाठी तत्पर रहा : एकनाथ शिंदेहरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप

सांगली : महापूराच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. या काळात कोणतीही रोगराई, साथीचे आजार पसरु नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत तत्पर रहा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन मदत साहित्याचे वाटप आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे नेते व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे - पाटील, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महापुराचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला असून ब्रम्हनाळची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे सांगून अदित्य ठाकरे म्हणाले, पाणी ओसरले असून आता मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. वीज बील माफी, पीक कर्जमाफी झाली आहे. पंचनामे गतीने सुरु आहेत. पडलेली घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधून देण्यात येतील. तोपर्यंत ग्रामीण भागासाठी 24 हजार व शहरी भागासाठी 36 हजार वार्षीक भाडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गावोगावी आरोग्य शिबिरे सुरु असून त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. असे आवाहन अदित्य ठाकरे यांनी केले.

 


Web Title: Be prepared for disease prevention: Eknath Shinde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.