मोठ्या ध्येयासाठी कष्टाची तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:56+5:302021-02-05T07:25:56+5:30
पुनवत : फक्त ध्येय मोठे असून चालत नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी तेवढीच लागते, असे प्रतिपादन शिराळ्याचे सहायक पोलीस ...

मोठ्या ध्येयासाठी कष्टाची तयारी ठेवा
पुनवत :
फक्त ध्येय मोठे असून चालत नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी तेवढीच लागते, असे प्रतिपादन शिराळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथील समाज विकास विद्यालयात गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एम. खोत तर प्रमुख पाहुणे म्हणून हाय्यर एज्युकेशन संस्थेचे संचालक व निवृत्त मुख्याध्यापक बी.डी. पवार, सरपंच तात्या पाटील उपस्थित होते.
यावेळी विराज पवार, विजय पवार, आशितोष सावंत, पौर्णिमा पवार या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुनील माने व माणिक गावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुप्रिया साळुंखे, रूपाली जाधव, मंगेश तिके, छाया पाटील, संदीप गोसावी, प्रज्ञा जाधव, मोहसीन मुल्ला, इकबाल आदी उपस्थित होते. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.
फोटो-०१पुनवत१
फोटो ओळ : सागाव (ता. शिराळा) येथील समाज विकास विद्यालयात गुणवंत माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बी. डी. पवार, आर. एम. खोत, तात्या पाटील उपस्थित होते.