शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

शेट्टी-खोत यांच्यात अस्तित्वाची लढाई : इस्लामपुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:02 AM

अशोक पाटीलइस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी चळवळीसाठी रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपची शाल पांघरली आहे, तर खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी संघटना पुन्हा शेतकºयांच्या बांधावर नेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला खुणावत आहेत. या दोघांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे. शेट्टी-खोत अस्तित्वासाठी चळवळीचे झेंडे गुडघ्याला बांधून एकमेकांवर दगडाचा मारा ...

ठळक मुद्देशेतकरी चळवळीचे झेंडे बांधले गुडघ्याला; निवडणुकीमुळे संघर्ष

अशोक पाटीलइस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी चळवळीसाठी रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपची शाल पांघरली आहे, तर खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी संघटना पुन्हा शेतकºयांच्या बांधावर नेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला खुणावत आहेत. या दोघांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे. शेट्टी-खोत अस्तित्वासाठी चळवळीचे झेंडे गुडघ्याला बांधून एकमेकांवर दगडाचा मारा करत आहेत.खा. शेट्टी यांनी गत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आघाडीत सामील होऊन स्वत:साठी हातकणंगले आणि सदाभाऊ खोत यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ मागून घेऊन आघाडी काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी या दोघांनीही निवडणूक खर्चासाठी शेतकºयांकडून मदत गोळा केली. नंतर मात्र ते भाजपच्या सत्तेत जाऊन बसले. भाजपला मात्र शेतकºयांचा विसर पडला म्हणूनच नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी शेतमालाच्या दरवाढीसाठी संप पुकारून चळवळीला नवीन दिशा दिली. हा संप फोडण्याच्या प्रक्रियेत खोत बदनाम झाले. त्यानंतर शेट्टी यांनी शेतकºयांचा बांध गाठून भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला. मंत्रीपद धोक्यात येईल म्हणून खोत यांनी खांद्यावर भाजपची शाल घेऊन रयत क्रांती संघटना उभी करून खासदार शेट्टी यांनाच आव्हान दिले.

आता आगामी लोकसभेसाठी शेट्टींविरोधात खोत यांनी संपर्क वाढवून चाचपणी सुरू केली आहे. तिकडे माढा मतदारसंघात शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तूपकर यांनी संपर्क वाढवून खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद घेऊन शेट्टी-तूपकर यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीचे रणांगण सुरू होण्याअगोदर नांगरट सुरू केली आहे. यातूनच शेट्टी-खोत संघर्ष पेटला आहे. याचा श्रीगणेशा सोलापूर जिल्ह्यातून झाला. एका शेतकºयाने खोत यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यावर खोत यांच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार केली तर, आता खोत यांच्या गाडीवर सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्याचे पडसाद इस्लामपुरात उमटले. खोत यांच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’चे कार्यालय फोडून शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले.शेट्टी-खोत एकत्रितपणे शेतीमालाच्या दरासाठी सरकारविरोधात लढत होते. या लढ्यात दोघांनीही पोलिसांच्या काठ्या खाल्ल््या आहेत. आता मात्र शेट्टी-खोत स्वत:च्या अस्तित्वासाठी एकमेकांवर दगडफेक करत आहेत.