मालगावात बॅटरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:32+5:302021-08-25T04:32:32+5:30

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथील कळंबी रस्त्यावरील खासगी कंपनीची ४० हजार रुपये किमतीची बॅटरी चोरट्याने लंपास केली. याबाबत ...

Battery theft in Malgaon | मालगावात बॅटरी चोरी

मालगावात बॅटरी चोरी

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथील कळंबी रस्त्यावरील खासगी कंपनीची ४० हजार रुपये किमतीची बॅटरी चोरट्याने लंपास केली. याबाबत आनंदराव बाबासाहेब पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

---------------

सिद्धेवाडीत दुचाकी चोरी

मिरज : सिद्धेवाडी (ता. मिरज) परिसरात दंडोबा डोंगराजवळून सतेज संभाजी सूर्यवंशी यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

------------

नरवाडमध्ये महिलेचा विनयभंग

मिरज : नरवाड (ता. मिरज) येथील एका महिलेस फोन करून दीपक तुकाराम पाटील (रा. कोल्हापूर) याने अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला. याबाबत महिलेने मिरज ग्रामीण पोलिसात पाटील याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

-----------

मिरजेत मटका घेणाऱ्यास अटक

मिरज : मिरजेत मार्केट परिसरात सारवान गल्लीत मटका घेणाऱ्या इरफान पठाण (वय २८) यास शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक हजार रुपये रोख रक्कम व साहित्य जप्त केले. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.

Web Title: Battery theft in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.