सांगलीत रिक्षाची बॅटरी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST2021-03-10T04:28:11+5:302021-03-10T04:28:11+5:30

सांगली : शहरातील श्यामरावनगर येथे रिक्षाची बॅटरी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी नियाज इब्राहीम शेख (वय ३०) यांनी फिर्याद ...

Battery lamp of a rickshaw in Sangli | सांगलीत रिक्षाची बॅटरी लंपास

सांगलीत रिक्षाची बॅटरी लंपास

सांगली : शहरातील श्यामरावनगर येथे रिक्षाची बॅटरी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी नियाज इब्राहीम शेख (वय ३०) यांनी फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

----

नांद्रेत एकास मारहाण

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे दुचाकींमध्ये झालेल्या अपघातावरून एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नजरुद्दीन अजिज मुजावर (वय ६१, रा. कर्नाळ रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली असून सोन्या प्रकाश पाटील, अनिल राजोबा (दोघेही रा. नांद्रे) यांच्याविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुजावर आणि त्यांचे भाऊ गौस मुजावर हे नांद्रे येथे आले होते. त्यावेळी बसस्थानकाजवळ संशयितांनी समोरून धडक दिली. त्यावरून झालेल्या वादावादीतून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

------

सांगलीत एकास मारहाण

सांगली : शहरातील कुपवाड रस्त्यावर उधारीचे पैसे मागण्यासाठी आल्याच्या कारणातून मोहन शंकर केंरुरे (वय ४२, रा. हरिपूर रस्ता, सांगली) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संगीता राजाराम जाधव, विजय राजाराम जाधव, रवी बाबर, विक्रम रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलिसात घटनेची नोंद आहे.

Web Title: Battery lamp of a rickshaw in Sangli