कुपवाडच्या दर्गा सरपंचपदी बशीर मुजावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:16+5:302021-08-25T04:32:16+5:30

कुपवाड : कुपवाडमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर लाडले मशायक दर्ग्याच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते बशीर मुजावर यांची एकमताने ...

Bashir Mujawar as Sarpanch of Dargah of Kupwad | कुपवाडच्या दर्गा सरपंचपदी बशीर मुजावर

कुपवाडच्या दर्गा सरपंचपदी बशीर मुजावर

कुपवाड : कुपवाडमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर लाडले मशायक दर्ग्याच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते बशीर मुजावर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

कुपवाडमधील हजरत पीर लाडले मशायक यांचा दर्गा हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. दर तीन वर्षांनी दर्ग्याच्या सरपंचांची निवड केली जाते. मावळते सरपंच काशीम मुजावर यांचा कार्यकाल संपल्याने निवड करण्यात आली. बशीर मुजावर यांची निवड होताच मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. दर्ग्याच्या विकासासाठी अग्रक्रम राहण्याबरोबरच हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा वृद्धिंगत कशी राहील, याकडे लक्ष देणार असल्याचे निवडीनंतर ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते जमीर रंगरेज, नासीर मुजावर, जहिर मुजावर, इस्माईल मुजावर, अमीरहमजा मुजावर, शाबाज मुजावर, अजमेर मुजावर, आरिफ मुजावर, शकील मुजावर, अकिब मुजावर उपस्थित होते.

Web Title: Bashir Mujawar as Sarpanch of Dargah of Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.