पलूसच्या संग्राम पतसंस्थेला बापूसाहेब येसुगडेंचे नाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:52+5:302021-02-23T04:41:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : येथील संग्राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व संग्राम विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात ...

पलूसच्या संग्राम पतसंस्थेला बापूसाहेब येसुगडेंचे नाव देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : येथील संग्राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व संग्राम विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेला संस्थापक दिवंगत बापूसाहेब येसुगडे यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदराव पुदाले होते. प्रास्ताविक माजी अध्यक्ष विलास लोंढे यांनी करताना बापूसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्रद्धांजली वाचन नगरसेवक कपिल गायकवाड यांनी केले. संग्राम पतसंस्थेेेचे अहवाल वाचन उपाध्यक्ष भरत गोंदील यांनी तर विषय पत्रिका वाचन व्यवस्थापक आनंदराव जाधव यांनी केलेे. संग्राम विकास कार्यकारी सोसायटीचे अहवाल वाचन सचिव शशिकांत पवार यांनी केले. यावेळी बिळूरचे सरपंच व भाजपचे शिराळा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, सुनील घोरपडे, नारायण निकम, नगरसेवक दिलीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पलूसचे नगरसेवक नीलेश येसुगडे यांनी संग्राम पतसंस्था व संग्राम विकास सोसायटीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी संग्राम विकास सोसायटीचेेेे अध्यक्ष शामराव धमके, औद्योगिक विकास सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील, सूर्यकांत बुचडे, अशोक पाटील, जीवन मोरे, पोपट नलवडे, पी. के. पाटील, मालोजी माने उपस्थित होतेेेे.