शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:06 IST

बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन झाले आहे. ते 96 वर्षांचे होते.

सांगली - जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या आणि खासगी सावकारीविरोधात 40 वर्षे रक्तरंजित लढा देणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर  यांचे वयाच्या ९६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले. इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

नव्वदीनंतरही तब्बेत ठणठणीत, वाणी खणखणीत, बुद्धी शाबूत असणाऱ्या बापू बिरू यांच्यावर जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. दणकट अंगकाठी, झुपकेदार मिशा, डोक्यावर पटका, खांद्यावर घोंगडे आणि हातात तळपती फरशी कुर्हाड ही त्यांची वैशिष्ट्ये होती.कृष्णा खोऱ्यात गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात बापू बिरु यांनी आवाज उठवला होता. त्यातूनच हत्याचे आरोपही त्यांच्यावर होते. हत्यांची मालिका रचणारे बापू बिरू तीस वर्षे पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांच्या टोळीपुढे पोलिसांनी हात टेकले होते.

अखेर गावगुंड आणि खासगी सावकारीला चाप लावल्यानंतरच त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. हत्यांच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून ते परतले होते.  गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. भजन, प्रवचनात ते रमले होते. मात्र बोरगावसह वाळवा, कराड तालुक्यात त्यांची दहशत कायम होती. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असणाऱ्या बापू बिरूंवर मराठी चित्रपटही निघाला होता. काही तमाशा फडांतील वगनाट्येही बापू बिरूंवर बेतली होती. शाहीरांनीही त्यांच्यावर कवने केली होती.