नेट कनेक्टिव्हिटीअभावी ताकारीत बँक व्यवहार ठप्प
By Admin | Updated: November 11, 2015 23:38 IST2015-11-11T23:00:54+5:302015-11-11T23:38:54+5:30
ग्राहकांचा खोळंबा : भवानीनगर शाखेतील प्रकार

नेट कनेक्टिव्हिटीअभावी ताकारीत बँक व्यवहार ठप्प
ताकारी : भवानीनगर (ता. वाळवा) येथे दूरसंचार विभागाची ओ.एफ. सी. केबल तुटल्याने ऐन दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी दूरध्वनी सेवेबरोबरच नेट कनेक्टिव्हिटीअभावी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत बसावे लागले. अनेकांना बँकेतून पैसे न मिळाल्याने दिवाळीची खरेदी करता आली नाही.दिवाळीनिमित्त पगार झाले, बोनसही खात्यावर जमा झाला. शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली. दिवाळी दणक्यात साजरी करायची, हा बेत आखून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मात्र नेट कनेक्टिव्हिटीचा फटका बसला. सर्व व्यवहार बंद असल्याने पैसे मिळाले नाहीत.सध्या बहुतांशी बँका आॅनलाईन व्यवहार करीत आहेत. इंटरनेट सेवा, नेट कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय बँकेत कोणताच व्यवहार होत नाही. यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या भवानीनगर शाखेत आलेल्या ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. यामुळे नाराजी व्यक्त होत होती. (वार्ताहर)
समस्या नेहमीचीच : पर्यायी व्यवस्थेची गरज..!---'दूरसंचार विभागाची ओ.एफ.सी. केबल मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याखालून नेलेली आहे. पूल, रस्त्याच्या कामादरम्यान नेहमी या केबल तुटतात. याचा परिणाम म्हणून दूरध्वनी, नेट बंद होते. त्यामुळे बँकेने नेट कनेक्टिव्हिटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे.