शिवप्रताप मल्टिस्टेटला सलग सातव्यांदा बँको पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:30+5:302021-02-07T04:24:30+5:30

प्रतापराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप पतसंस्थेने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सलग सातव्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यात संस्था ...

Bank Award to Shivpratap Multistate for the seventh time in a row | शिवप्रताप मल्टिस्टेटला सलग सातव्यांदा बँको पुरस्कार

शिवप्रताप मल्टिस्टेटला सलग सातव्यांदा बँको पुरस्कार

प्रतापराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप पतसंस्थेने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सलग सातव्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यात संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळात संस्थेने १० हजार मास्क, १० हजार सॅनिटायझर, १ हजार अन्नधान्य किट, कोविड योद्धा म्हणून भूमिका बजावणारे पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य सेविका, डॉक्टर यांना सुरक्षा किटचे वाटप केले. त्या बरोबरच संस्थेच्या ग्राहकांना अविरत घरपोहोच सेवा दिली आहे. कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी पतसंस्था अल्पावधीत करीत असलेली गुणात्मक प्रगती, सर्व पातळीवर सातत्यपूर्ण ग्राहकाभिमुख सेवा या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार संस्थेवरती दृढ विश्वास असणारे सभासद तसेच आपुलकीने काम करणारे कर्मचारी यांचे योगदान आहे. या सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने संस्था लवकरच रु. १५० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करीत असल्याचे सांगितले.

फोटो – ०६०२२०२१-विटा-प्रतापराव साळुंखे, विटा.

फोटो- ०६०२२०२१-विटा-विट्ठलराव साळुंखे, विटा.

Web Title: Bank Award to Shivpratap Multistate for the seventh time in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.