नवरत्न पतसंस्थेला बँको पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:20+5:302021-02-09T04:29:20+5:30
आष्टा : नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेला सलग सातव्या वेळी बँको पुरस्कार जाहीर ...

नवरत्न पतसंस्थेला बँको पुरस्कार
आष्टा : नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेला सलग सातव्या वेळी बँको पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थापक-अध्यक्ष सचिन चौगुले व उपाध्यक्ष संतोष थोटे यांनी दिली.
चौगुले म्हणाले की, १० ते १५ कोटी ठेवी या विभागात देण्यात येणारा बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन २०२१ हा पुरस्कार नवरत्न पतसंस्थेला जाहीर झाला आहे. संस्थेने गोरगरीब नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सचिव प्रमोद कोरेगावे म्हणाले की, संस्थेच्या ठेवी १३ कोटी २४ लाख, कर्जे ११ कोटी ३७ लाख, भागभांडवल ५५ लाख ४८ हजार, निधी १ कोटी ६१ लाख रुपये आहेत. पारदर्शी व लोकाभिमुख कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
फोटो सचिन चौगुले, संतोष थोटे