शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘व्हॅलेंटाइन डे’ ऑफरचे चॉकलेट करतंय बँक खातं रिकामे, ऑफरच्या लिंकमधून ऑनलाईन डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:04 IST

हॅकर्सनी चॉकलेटचे आमिष दाखवून तुमच्या खात्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे.

शरद जाधव

सांगली : प्रेम व्यक्त करण्याचा दिन अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सप्ताह आता सुरू झाला आहे. चॉकलेट डे, रोझ डेसह रोज एक ‘दिन’ साजरा होणार आहे. नेमकी याचीच संधी साधत हॅकर्सनी चॉकलेटचे आमिष दाखवून तुमच्या खात्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे.‘व्हॅलेंटाइन डे ऑफर्स लिंकवर क्लिक करून माहिती भरा आणि पाच हजारांचे चॉकलेट मिळवा’ या आशयाचे संदेश अनेकांना येत असून, यातील काहींनी चॉकलेटच्या आमिषाने माहिती भरल्यानंतर बँक खात्यातूनच रक्कम वजा होत आहे.

कोणतीही ऑफर दिली की, ग्राहक त्याकडे आकृष्ट होताेच. नेमके हेच हेरून आता हॅकर्सनी लिंक पाठवून आपल्या वैयक्तिक माहितीवर खाते रिकामे करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. आता ऑनलाइन पद्धतीने पैसे लांबविणाऱ्या टोळीने ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधले आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने असलेल्या या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एका नामवंत कंपनीचे पाच हजार रुपयांचे चॉकलेट मोफत दिली जातील. ‘त्या’ नामवंत कंपनीच्या नावानेच सुरुवात होणारी लिंक असल्याने अनेकांना ही अधिकृत ऑफर असल्याचे वाटत असल्याने लिंकवर क्लिक करीत आहेत.लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्या माहितीचा गैरवापर होत नाही, तर ठराविक दिवसांनंतर रकमा वजा झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा अनोळखी आणि ऑफरच्या लिंकवर कोणीही आपली माहिती भरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लिंकवर क्लिक, पैसे गायब

यापूर्वीही अशाच अनेक ऑफरच्या लिंक मोबाइलवर व्हायरल होत होत्या. यातील लिंकवर केवळ क्लिक केल्यानंतरही अनेकांचे पैसे गेले आहेत. यात तीन ते आठ हजार रुपये बॅंक खात्यातून वजा झाल्याने अशा लिंक धोकादायक ठरू शकतात.

कोणतीही कंपनी कितीही मोठी असली तरी ती अशा लिंकद्वारे कधी ऑफर देत नाही. विक्रेत्यांच्या माध्यमातूनच ऑफर देण्याची शक्यता असते. त्यामुळे यापूर्वी फसवणुकीचे प्रकार घडले असल्याने अशाप्रकारे कोणीही लिंकवर क्लिक करून ऑफर मिळविण्याचा प्रयत्न करू नये, यात फसवणुकीची शक्यता आहे. - दिनेश कुडचे, सायबरतज्ज्ञ

टॅग्स :SangliसांगलीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेcyber crimeसायबर क्राइम